शहर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन; गुन्हेगारांविरुध्द धडक कारवाई करण्यास सुरुवात


दक्ष न्यूज: करणसिंग बावरी

नाशिक – शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री अचानक कोम्बिंग ऑपेरेशन करण्यात आले. यात शहरातील विविध ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली. या शहरातील सर्व अधिकारी आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले.


गेल्या आठवड्यात सुनील वाघ खून प्रकरणात दोषींना शिक्षा झाली. पोलिसांच्या अचूक तपासामुळे गुन्हेगारांना शिक्षा झाल्याने पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाईस प्रारंभ केला आहे. रविवारी रात्री अचानक सर्व पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी तपासणी मोहीम सुरु केली. लॉज, झोपडपट्ट्या, संशयित ठिकाणे, फरारी आरोपी, जामिनवरील आरोपी, हद्दपारीतील गुन्हेगार आदींची तपासणी आणि माहिती घेण्यात आली.


पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी, पंचवटीचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त डॉ. सिध्देश्वर, धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त शेखर देशमुख , सहा. पोलीस आयुक्त अंबादास भुसारे, सहा. पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, सहा. पोलीस आयुक्त, सोमनाथ तांबे, सहा. पोलीस आयुक्त, डॉ. सिताराम कोल्हे यांनी पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलीस आयुक्तालयात ही मोहीम राबवली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *