रिक्षातील प्रवाशांच्या बॅगेतील दागिने आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीला अटक


गुन्हे शाखा युनिट १ ची दमदार कामगिरी, परप्रांतीय टोळीस अटक करून ०३ गुन्हे उघडकीस

दक्ष न्यूज: प्रतिनिधी

नाशिक : रिक्षातील प्रवाशांच्या बॅगेतील दागिने आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीला गुन्हे शाखा १ ने अटक केली असून, त्यांच्याकडून लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

या प्रकरणी सरकारवाडा आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट एकला मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातील नगीना येथील साजिद वाजिद अली आणि मुस्तकीन बुंदू गौसपुर, सोनू उर्फ मोहम्मद आबिद मोहम्मद हुसेन शेख यांना ताब्यात घेतले.

आरोपींनी सरकारवाडा आणि नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या तीन गुन्ह्यांची कबुली दिलीय. त्यांच्याकडून सोन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम असा एकूण ३ लाख ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून करण्यात आलाय. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *