युवा सेनेच्या वतीने मोफत सर्वरोग तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन


नाशिक: दक्ष प्रतिनिधी

समाजसेवक स्व.शंकरराव निवृत्तीराव बर्वे व स्व.नर्मदाबाई निवृत्तीराव बर्वे यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्ताने समाजसेवक स्वर्गीय शंकरराव निवृत्तीराव बर्वे प्रतिष्ठान, सार्वजनिक वाचनालय नाशिक, शिवसेना युवासेना नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीच्या विपरीत परिस्थिती मध्ये शहरातील व परिसरातील नागरिकांची आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत सर्वरोग तपासणी व उपचार शिबीर या मध्ये उंची, वजन, रक्तदाब, शुगर, ब्लड ऑक्सिजन तपासणी, ECG सल्ल्यानुसार, डोळे तपासणी व गरज असल्यास मोफत चष्मे वाटप, पिवळे केशरी रेशनकार्ड धारकांसाठी अँजिओग्रोफी, अँजिओप्लास्टी व हृदय फिट पॅकेज अंतर्गत सवलतीच्या दरात ECG ,2D ECHO तपासणी यांचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केले. यावेळी चौधरी यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर,युवासेना संपर्क प्रमुख सिद्देशजी शिंदे ,सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे,सावानाचे जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर,नगरसेवक सुनील गोडसे, राजेंद्र वाकसरे,डॉ. राजन पाटील ,अमोल बर्वे ,मंदार बर्वे,राहुल बर्वे सचिन रत्ने,सिद्धांत काळे,पप्पु टिळे ,बालम शिरसाठ ,प्रवीण चव्हाण,पुष्कर अवधूत,विशाल संधान ,मनोज जाधव, नितीन बर्वे , प्रवीण कुटे,प्रवीण गोसावी आदी उपस्थित होते.

यावेळी 325 रुग्णांणी लाभ घेतला व 240 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हा चिटणीस गणेश बर्वे यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *