संपादकीय

उमेदवारीसाठी संगीत खुर्ची ..!


करणसिंग बावरी : दक्ष न्युज

नाशिक: लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा दिवस उजाडलाय पण अजून तरी उमेदवारीवरून महायुतीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीतील संघर्ष वाढतच चालला आहे. या जागेवरून महायुतीत कलगीतुरा रंगला असून उमेदवाराबाबतचा तिढा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जाणार अशी चर्चा आता रंगत आहेत.

Nashik: The day for filing applications for the Lok Sabha elections has dawned but still the conflict between BJP, Shiv Sena and NCP in the Grand Alliance over the nomination is increasing. There is a rift in the Mahayuti over this seat and there are discussions that the rift regarding the candidate will go up to the last day of filing the application.

नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर होऊन मतदार संघात प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. तर दुसरीकडे महायुती मध्ये प्रचार तर बाजूलाच सोडा पण उमेदवारी मिळेल की नाही यांचीच जास्त चिंता सतावत आहे. तिन्ही पक्षात उमेदवारीसाठी संगीत खुर्ची सुरू आहे.

नाशिकची जागा शिवसेनेकडे असतानाही या जागेवरून रस्सीखेच सुरू असून छगन भुजबळांच्या माघारीनंतर गोडसे यांना उमेदवारी मिळेल असे दिसत असताना राष्ट्रवादीने पुन्हा आक्रमकपणे मागणी रेटल्यामुळे शिवसेनेची अडचण वाढली आहे. कोणी तिकीट देता का आम्हाला असा प्रश्न थेट आता इच्छुक उमेदवार विचारायला लागले आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले व माणिकराव कोकाटे यांच्यात चढाओढ पाहायला मिळत आहे. यातून महायुती कोणाला उमेदवारी देणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *