निफाडचे आ. दिलीप बनकर यांच्या वाढदिवसाच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप..


दक्ष न्युज प्रतिनिधी: योगेश कर्डीले

निफाड : उपमुख्यमंत्री अजित पवार व निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जनविश्र्वास सप्ताह अंतर्गत निफाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व रायगड ग्रुपच्यातर्फे निफाड शहरातील जिल्हा परिषद शाळा नं २ येथे शिकणाऱ्या जवळपास ३०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

वह्या, कंपास बॉक्स, पट्टी-पेन्सिल किट, आणि खाऊचे वाटप येथील गरजू विद्यार्थी, विद्यार्थिनींना करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटत असताना अशाप्रकारे उत्तम प्रतीचे शालेय साहित्य मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांशी संवादादरम्यान कोणी पोलिस, कोणी शिक्षक, इंजिनिअर आणि डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र डोखळे, बापूसाहेब कुंदे, तनवीर राजे, जावेद शेख, दिलीप कापसे, किशोर ढेपले, रवींद्र परदेशी, दिपक भापकर, शाम गोळे, गणपत जाधव, प्रदीप कुंदे, सचिन कुंदे, नितीन कुंदे, अक्षय कोठारी, योगेश पटेल, अजहर राजे, शुभम चौरसिया, तेजस जाधव, निशिकांत कहाने, सोनू साळवे आदी उपस्थित होते. उपक्रमाचे आयोजन नगरसेवक सागर कुंदे यांनी केले होते. विद्यार्थ्यांना वाटलेल्या साहित्यानिमित्त शिक्षक व पालकांनी आभार मानले, सूत्रसंचलन सुरेश धारराव यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *