आता त्र्यंबकेश्वर तालुक्यात विद्यार्थी घेणार डिजिटल शिक्षण!


दक्ष न्युज प्रतिनिधी: गोकुळ ढोरे

त्र्यंबकेश्वर: आज देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तरी अद्यापही काही ग्रामीण भागात डिजीटल शिक्षण काय आहे हे माहीत नसते. डिजिटल शिक्षण माहिती होणे काळाची गरज आहे. या गोष्टीची दखल वारसविहिर जिल्हा परिषद शिक्षक यांनी घेतली व नाशिक मधील प्रसिद्ध व्यावसायिक तथा शैक्षणिक व सामाजिक कार्यात नेहमी पुढे असणारे विनोद पारखे यांनी डिजिटल शिक्षणची बाब लक्षा घेत मदतीचा हात पुढे करतं वारसाविहिर जिल्हा परिषद शाळा यांना अभ्यासक्रम साठी स्मार्ट टिव्ही व पेन्डड्राईव्ह भेट दिली आहे.

ग्रामीण भागात आजही काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे. भारत हा तरुण देश म्हणून ओळखला जातो मात्र याच भारतात आजही काही ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. त्यातच आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वारसाविहिर येथील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळणार असल्याने विद्यर्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *