आपला आणि कामगार पॅनलमध्ये राडा? चर्चेवेळी झाला राडा..


दक्ष न्युज प्रतिनिधी: दिनेश पगारे

नाशिक: करन्सी नोट प्रेस मध्ये दर तीन वर्षानी युनीयन व वर्क्स कमिटीची निवडणूक एकाच वेळी होत असते. प्रेस कामगार मोहन रावले हे 1999 पासुन करन्सी नोट प्रेस मध्ये ऑपरेटर म्हणून नोकरीस आहे. सन 2024 ते 2027 पर्यतची युनीयन व वर्क्स कमीटीची निवडणूक एकाचवेळी आयोजित करण्यात आली आहे. सदर निवडणूकीत मोहन रावले हे देखील आपला पॅनल तर्फे निवडणूकीस उमेदवार म्हणून उभे आहे.

दिनांक १५ जुलै रोजी निवडणुकीतील दोन्ही पॅनेलचे मेंबर हे ऑफिसमध्ये गेले असता तेथे कामगार पॅनलचे प्रतिनिधी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी कामगार पॅनलचे जनरल सेक्रेटरी जगदिश गोडसे हे देखील उपस्थित होते. सदर ठिकाणी निवडणूकीत बाद झालेल्या फॉर्म बद्दल चर्चा होती.

या चर्चेवेळी आंतरराष्ट्रीय कृतीचे कामगार नेते भावी आमदार जगदीश गोडसे हे काहीही कारण नसतांना रावले यांच्या अंगावर धावून गेले असून त्यांना मारहाण व शिवीगाळ केल्याचं समोर आलाय. एवढ्यावरच न थांबता तेथे उभे असणारे काशीनाथ पाटोळे,राजेश पगारे यांना देखील जगदिश गोडसे यांनी शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिल्याने संताप व्यक्त केला जातोय.

दरम्यान जगदीश गोडसे यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावी करण्यात आलीय. यावेळी कामगार नेते तक्रारदार राजेश पगारे, राजाभाऊ चव्हाण, किरण गांगुर्डे यांसह आपला पॅनलचे सर्वच कामगार बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *