आषाढी एकादशीनिमित्त वारस विहीर शाळेत रंगला विद्यार्थी दिंडी उत्सव…
दक्ष न्युज प्रतिनिधी: गोकुळ ढोरे
त्र्यंबकेश्वर: मंगळवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वारसविहीर ता.त्र्यंबकेश्वर , जि. नाशिक येथे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थी (बाल वारकरी) दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील मुलामुलींनी सांप्रदायिक वेषभूषा करून टाळ, मृदंग, तुळस, झाडांचे रोपे तसेच ग्रंथ हातात घेऊन दिंडीतून हरिनामाच्या तथा जनजागृती व शिक्षण हक्काच्या घोषणा दिल्या.

अवघा परिसर जयघोषाने दुमदुमून गेला होता. मुलांनी वारकरी संप्रदायाचे नृत्य टाळ मृदुंगाच्या गजरात केले. पूर्ण परिसर वारीमय झाला होता. दिंडी दरम्यान विद्यार्थ्यांनी गोल रिंगण व पारंपरिक फुगडी नृत्याचे सादरीकरण केले. याप्रसंगी गावातील पालक वर्ग, ग्रामस्थ व माता भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सदर कार्यक्रमास वारसविहीर शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद आदि उपस्थित होते.