मोठी बातमी! उत्तर मध्य मुंबईतून वकील उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी..


मुंबई: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर मध्य मुंबईतून भाजपने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपच्या नेत्या आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना भाजपकडून उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र भाजपने त्यांचा पत्ता कट करून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे.

वकील उज्वल निकम यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यातून उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून तिकीट देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या मतदारसंघात काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोघांचाही एकमेकांशी सामना होणार आहे.

या मतदारसंघात प्रथमच प्राध्यापिके विरोधात एका वकिलाची लढत होणार असल्याने या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे वर्षा गायकवाड आणि उज्जवल निकम यांचा या मतदारसंघाशी संबंध नसतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *