पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर तर्फे मतदान; एक राष्ट्रीय कर्तव्य या भावनेची रुजवणूक..


दक्ष न्युज प्रतिनिधी

ओझर: पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथे विद्यार्थी संविधानिक मंडळाची नियुक्ती करण्यासाठी मतदानाचे आयोजन करण्यात आले होते. आपली जबाबदारी व अधिकार, मजबूत लोकशाही चा आधार। आपल्या मताने बदल घडेल, समाज सुधारेल. चांगल्या उद्यासाठी आजच मतदान करा. या उद्देशाने मतदानाचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते. याच दृष्टीकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राथम्याने बजावणे नितांत गरजेचे आहे. किंबहूना मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

हीच भावना सर्व नागरिकांच्या मनात रुजवण्यासाठी व मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना देखील समजण्यासाठी पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथे विद्यार्थी संविधानिक मंडळाची नियुक्ती करण्यासाठी मतदानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्राईम मिनिस्टर, स्पोर्ट्स मिनिस्टर, डिसिप्लिन मिनिस्टर, कल्चरल सेक्रेटरी, असेम्ब्ली सेक्रेटरी इत्यादी दहा पदे होती. या दहा पदांसाठी इयत्ता सातवी ते नववी वर्गातील 30 उमेदवार विद्यार्थी उभे होते. या सर्व उमेदवारांसाठी ऑनलाइन पद्धतीने मतदान राबवण्यात आले.

या मतदानामध्ये शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मताप्रमाणे योग्य व पात्र उमेदवार निवडण्याची संधी उपलब्ध होती. प्रत्येक विद्यार्थ्याने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच शालेय कामकाज अधिक सक्षम होण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब सर्व विद्यार्थ्यांना गांभिर्याने लक्षात आली. त्याचबरोबरच लोकशाही मधील मतदान प्रक्रिया उत्कृष्टरिता समजली. पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथे मतदान प्रक्रिया अतिशय उत्साहात पार पडली. मतदानाचे आयोजन शाळेचे क्रीडा शिक्षक राकेश शर्मा यांनी केले.

निवडणूक (पिठासिन) अधिकारी शाळेच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके, नोंदणी अधिकारी दिपाली भारती , योगिता शिरसाठ, शिवानी गायकवाड, मतदान अधिकारी नितीन ठाकरे, मतदान कक्ष अधिकारी बिंजल तांबट, फ्रेनी पोकार आणि मयुरी सुरेवार यांच्या निरीक्षणाखाली मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न झाली. विद्यार्थी संविधानिक मंडळ नियुक्तीची कल्पना शाळेच्या प्रा. डॉ. जसिंथा पारके यांच्या बहुमोल मार्गदर्शनाने साकारण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *