आ. नरहरी झिरवाळ यांच्या बद्दल अपशब्द बोलणा-यावर गुन्हा दाखल करा,पेठ तालुक्यातील सर्व पक्षीयांची मागणी..


दक्ष न्युज प्रतिनिधी, गोरख जाधव

नाशिक: पेठ दिडोंरी मतदारसंघाचे आमदार विधान सभेचे उपाध्यक्ष व आदिवासी नेते नरहरी झिरवाळ यांच्या बद्दल बीड येथील सभेतुन राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव व आहिल्यादेवी मेंढी शेळी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडकले यांनी सभेतुनझिरवाळ यांच्या बद्दल नाव घेवुन बेताल वादग्रस्त अपशब्द वापरून राज्यातील तमाम आदिवासी बांधवाच्या भावना दुखावल्या असुन दोडकलेवर तात्काळ गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात यावी अन्यथा राज्यभर आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलने छेडण्यात येईल असा इशारा तहसीलदार आशा गांगुर्डे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी गिरीश गावित, गोकुळ झिरवाळ,गणेश गवळी,हिरामण पवार, दामु राऊत, करण करवंदे,भास्कर गावित, पंकज पाटील, सुरेश खंबाईत, रामदास गवळी,शाम गावंडे,विनोद सहाळे,शितल रहाणे,पुनम गवळी, सरीता हाडळ,पांडु दरोडे,नामदेव वाघेरे, यादव गावित, गिरिधर वाघेरे,जितेंद्र जाधव, निवृती सापटे,हरिदास भोये,नेताजी गावीत, अलका कस्तुरे,रामेश्वरी जाधव,मनोहर चौधरी,अंबादास भोये,एकनाथ ढाढर, तुळशीराम बोरसे,संदीप कुभांर,सुरेश भोये,चिंतामण पवार हेमराज जाधव आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *