ब्रेकिंग! शरद पवार गटाला मोठा धक्का! राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा…
महाराष्ट्र: राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार हा मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी शरद पवार गटाचे आमदारही पात्र ठरवण्यात आले.
विधिमंडळातील बहुमत पाहता मूळ राष्ट्रवादी ही अजित पवारांची असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. दहाव्या सूचीचा वापर हा पक्षांमधील बेशिस्तीसाठी वापरता येणार नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह देखील अजित पवार गटाला दिल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.