माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम खून प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ आक्रमक..


दक्ष न्युज प्रतिनिधी, संतोष विधाते

दिंडोरी: सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खुनाची सफल चौकशी करून दोषी खुणांवर कठोर कारवाई करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ आग्रही आहे.

काय आहे प्रकरण?

याबाबत सविस्तर वृत्त असे की, संतोष कदम गाव भाग सांगली हे शासन व प्रशासनातील भ्रष्टाचारा विरोधात लढणारे माहिती कार्यकर्ते होते. त्यांनी जिल्ह्यातील अनेक भ्रष्टाचारांची प्रकरणी बाहेर काढून शासन व प्रशासन पारदर्शी चालावे म्हणून अनेक धोके स्वीकारून त्यांचे कार्य चालू ठेवले होते. मात्र दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांचा खून झालेला मृतदेह आढळून आला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली.

संतोष कदम यांनी सांगली महानगरपालिका तसेच अन्य सरकारी कार्यालयातील अनेक भ्रष्टाचारांची अनेक प्रकरणे माहिती अधिकारात बाहेर काढली होती. मात्र त्यांचा खून करण्यात आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.

भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे स्थानिक पातळीवरील भ्रष्ट लोकप्रतिनिधी, भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी, भ्रष्ट ठेकेदारांची लॉबी तसेच पोलिसांना न जुमांनारे गावगुंड यांच्या चौकडीने संतोष कदम यांचा बळी घेतल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने केला आहे.

दरम्यान शासनाने आता तरी गंभीर होऊन संतोष कदम यांच्या पुण्याला त्वरित जेरबंद करून कठोर व कायदेशीर कारवाई करावी यांसह अनेक मागण्यांचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खुण्यावर कारवाई होणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यावेळी संतोष विधाते, सोमनाथ अवतार, आनंदा शिंगाडे, गोरख जाधव, दीपक गवारे यांसह माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *