क्राईमनाशिकमहाराष्ट्र

अवैधरित्या दारू विकणारे गजाआड! इंदिरानगर पोलिसांची कारवाई..


दक्ष न्युज प्रतिनिधी

नाशिक: शहरात सद्या गुन्हेगारी व अवैध धंद्याने हाहाकार माजला आहे. या पार्शवभूमीवर इंदिरानगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इंदिरानगर पोलीस ठाणे ठाण्यात दारूबंदी कायदा 1949 कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच पार्शवभूमीवर इंदिरानगर पोलिसांनी गणेश सुरेश घोडे, वय ३२ व राजू बाळू कवठेकर, वय ४२ यांना ताब्यात घेऊन ७ हजार ७६० रुपये किमतीच्या देशी व विदेशी कंपनीच्या एकूण ११९ सीलबंद बाटल्या हस्तगत केल्या आहेत.

दरम्यान यातील आरोपी यांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 (ई ) याचे उल्लंघन करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दारूची अवैधरित्या विक्री करतांना आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान आता शहरात दिवसानुदिवस वाढत जाणाऱ्या या अवैध धंद्यांना आता पोलीस आळा कसा घालणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *