महानगरपालिकेतील घोटाळा उघड! जाणून घ्या काय आहे प्रकरण..


२८ ठिकाणी होल्डिंग लावण्याचा परवाना असताना ६३ ठिकाणी होर्डिंग कशा?

दक्ष न्युज प्रतिनिधी

नाशिक: ३० जानेवारी रोजी नाशिक आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. याचं कारण होतं पालिकेत सुरू असलेला होर्डिंगचा झोल. महापालिकेतील विविध कर विभागात जाहिरात व परवाने विभागातील अधिकाऱ्यांच्या संगमने कोट्यावधींचा होर्डिंग घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे महापालिकेला कोट्यावधीचा नफा झाल्याचे उघडकीस आले आहे.

यावेळी शहरात ठेकेदाराला २८ ठिकाणी होर्डिंग लावण्याचा परवाना असताना तब्बल ६३ ठिकाणी होल्डिंग लावण्यात आल्याचा आरोप नाशिक आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.

  • याबाबत सविस्तर:

महानगरपालिकेच्या जाहिरात व परवाने विभागाकडून महापालिका हद्दीतील खुल्या जागांवर जाहिरात फलकांसाठी १६ जानेवारी २०२२ रोजी निविदा काढण्यात आली. निविदेत शहरातील २८ खुल्या जागांवर जाहिरात फलक उभारण्यासाठी दर मागवण्यात आले होते. त्यासाठी पुण्यातील ठेकेदाराला ठरवलं गेलं. मात्र निविदा प्रक्रियेतील अटी व प्रत्यक्ष कार्यारंभात आदेश देताना मोठ्या प्रमाणात हेराफेरी केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

यासंदर्भात संघटनेच्या माध्यमातून पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे तक्रार देण्यात आली असून त्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिली असल्याची माहिती विक्रम कदम यांनी दिली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *