अखेर ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली! अयोध्येत रामलल्ला विराजमान..
छत्रपतींनंतर दुसरे श्रीमंत योगी देशाला मिळाले: गोविंदगिरी महाराज..
मानसी देशमुख, दक्ष न्युज
अयोध्या: देशात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. अखेर ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली असून अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हि पूजा संपन्न झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी ते भावुक झाल्याचे देखील दिसून आले. २२ तारीख हि फक्त तारीख नाही तर २२ तारखेपासून नव्या कालचक्राची सुरुवात झाली हा अलौकिक क्षण असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाल्याचे दिसून आले.
यावेळी भाषणादरम्यान गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत केली. छत्रपती शिवाजी महारांच ज्या पद्धतीने स्वामी समर्थानी श्रीमंतयोगी असा उल्लेख केलेला तसाच श्रीमंत योगी मोदींच्या रूपात आपल्याला लाभला असे गोविंदगिरी महाराज म्हणाले.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३ दिवसांचं अनुष्ठान सांगितलेले असताना ११ दिवसांचं अनुष्ठान केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नाशिकवरून सुरुवात करत अनेक ठिकाणी जाऊन ते जणू काही निमंत्रण देत होते कि, दिव्या आत्म्यांनो अयोध्येला या आणि आमच्या देशाला महान बनवण्यासाठी आशीर्वाद द्या. अशा शब्दांमध्ये गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.