मनमाड रेल्वे ब्रीजचे काम अंतिम टप्प्यात..


दक्ष न्युज प्रतिनिधी, रुपाली केदारे

मनमाड: गेल्या काही दिवसांपूर्वी मनमाड येथील रेल्वे ओवर ब्रिजचा काही भाग कोसळला होता. त्याची दखल घेत आमदार सुहास कांदे यांनी तत्काल ही गोष्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. व त्यानंतर ब्रिजचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे म्हणून ३ कोटी रुपये निधी त्यांनी उपलब्ध करून दिला.

त्यानंतर आमदार सुहास कांदे यांच्या आदेशाने दिनांक २२ जानेवारी रोजी शिवसेना युवासेना पदाधिकारी यांनी मनमाड रेल्वे ब्रिजच्या चालू असलेल्या कामावर जाऊन पाहणी केली. या कामाची पाहणी करण्याकरीता युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले, आप्पा आंधळे, लोकेश साबळे, विशाल सूर्वासे,राकेश ताठे उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *