एफडीएच्या सहआयुक्तपदी अशोक बर्डे


दक्ष न्यूज प्रतिनिधी: परमेश्वर आंधळे

नाशिक : अहमदनगर येथील अन्न व औषध प्रशासन (औषध) विभागाचे सहायक आयुक्त अशोक बर्डे यांना नाशिकच्या सह आयुक्त पदावर बढती देण्यात आली आहे. आज मंगळवारी त्यांनी नाशिकचे मावळते सह आयुक्त डोंगळीकर यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे.

नाशिकचे सहआयुक्त मुकुंद डोंगळीकर यांची ठाणे येथे सहायक आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.अशोक बर्डे यांनी नगर जिल्ह्यात दोन महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यापूर्वी ते बुलढाणा (विदर्भ) येथे कार्यरत होते. दरम्यान, समर्थ क्रांती फाउंडेशनच्यावतीने बर्डे यांचे स्वागत तर मावळते सह आयुक्त डोंगळीकर यांना निरोप देण्यात आला.

यावेळी समर्थ क्रांती फाऊंडेशनचे संस्थापक धनंजय खाडगीर, विजय गायखे, संजय गिरासे, विजय अमृतकर, तुषार बोरसे, दिलीप बागल आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *