पतंग काढताना विजेच्या धक्क्याने युवक जखमी


दक्ष न्यूज प्रतिनिधी: परमेश्वर आंधळे

सातपूर : विजेच्या खांबावरील पतंग काढताना विजेचा धक्का बसून अशोकनगरला युवक जबर जखमी झाला आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

शुभम एकनाथ जाधव (२४, रा. उमा कुंज अपार्टमेंट, विश्वासनगर, अशोकनगर) सातपूर एमआयडीसीतील गोल्डी प्रेसमध्ये कामास आहे. सोमवारी (दि. १५) सायंकाळी ५ वाजता कामावरून घरी आल्यावर तो गच्चीवर गेला होता. या दरम्यान गच्चीसमोरील उच्च क्षमतेच्या तारेला अटकलेली पतंग लोखंडी रॉड च्या साहाय्याने काढताना त्यास विजेचा झटका बसल्याने तो मागे फेकला गेला.

या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच तो ४८ टक्के भाजला आहे. गंभीर अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुभम हा एकुलता एक असून आई व बहीण असा परिवार आहे. चार महिन्यांपूर्वी तो परिसरात भाड्याने रहायला आला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *