कळवण येथे विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रम संपन्न..


दक्ष न्युज प्रतिनिधी, उमेश कापडणीस

कळवण: येथील शेरी भैताने विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासन नागरिकांसाठी विविध विकासाच्या योजना राबवित आहेत. या जनकल्याणकारी योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊन आपला विकास साधण्याचे आवाहन यावेळी डॉ. भारती पवार यांनी केले.

तसेच डॉ. भारती पवार यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ समस्या सोडवण्याचे निर्देश दिलेत. तसेच या जनकल्याणकारी शासकीय योजनेपासून कुणीही लाभार्थी वंचित राहणार नाही व त्याचप्रमाणे नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आदेश ही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेत .कार्यक्रमा दरम्यान डॉ. भारती पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिपक खैरनार, रमेश थोरात, सुधाकर पगार, गोविंद कोठावदे, ठाकरे बाबा,चंद्रकांत गवळी,संतोष गावीत, पोपट गायकवाड,केदा बहिरम,यतिन पवार, एस. के. पगार,आशुतोष आहेर, काशिनाथ गुंजाळ, हेमंत पगार,हितेंद्र पगार,सरपंच, उपसरपंच,बीडीओ निलेश पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ जांगर,विस्तार अधिकारी युवराज सोनवणे, महाले यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *