३१ डिसेंबरच्या पार्शवभूमीवर पोलिसांचे जनतेस आवाहन; जाणून घ्या काय आहे आवाहन..


दक्ष न्युज प्रतिनिधी, प्रवीण सुरुडे

नाशिक: ३१ डिसेंबरच्या पार्शवभूमीवर पोलीस सतर्क असल्याचे दिसून येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस अँक्शन मोड मध्ये आले आहे. नवीन नर्षाच्या स्वागतासाठी मद्यपींकडून विविध रिसोटर्स, हॉटेल्स, हॉटेल्सवरील रुफ टॉप, ढाबे, क्लब, रहिवासी सोयायटींमधील क्लब या ठिकाणी पाटर्यांचे विना परवानगी आयोजन केले जाते. त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसे आवाहन देखील नागरिकांना करण्यात आले आहे.

काय आहे आवाहन?

  • मद्यविक्री परवाना नसलेल्या रिसोटर्स, हॉटेल्स, हॉटेल्सवरील रुफ टॉप, ढाबे, क्लब या ठिकाणी मद्यसेवन करण्यास ग्राहकांनी जाऊ नये, तसे आढळून आल्यास त्यांचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ चे कलम ६८ व ८४ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. सदर कारवाई अंतर्गत तीन वर्षापर्यंत कारावासची शिक्षा तसेच रु.५००० पर्यंत द्रव्यदंड आकारण्याबाबत तरतुद आहे.
  • रिसोटर्स, हॉटेल्स, हॉटेल्सवरील रुफ टॉप, ढाबे, क्लब, रहिवासी सोयायटींमधील क्लब यांना विना परवानगी पाटर्धांचे आयोजन करण्यात येवू नये याबाबत फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४९ अन्वये नोटीस देण्यात आलेल्या आहेत. अनुज्ञप्तीधारकांना मद्यसेवन परवान्यावर मद्याची विक्री करणे बंधनकारक आहे त्यामुळे त्यांनी मद्यसेवन परवान्यावर मद्याची विक्री करावी.
  • या विभागाकडून अशा विशेष कार्यक्रमासाठी अनुज्ञप्ती देण्यात येते. तरी ज्यांना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्यांचे योजन करावयाचे आहे. त्यांनी या विभागाकडे ऑनलाईन विनंती अर्ज करुन प्राप्त करुन घ्यावे.
  • अवैध मद्याची विक्री होत असल्याचे तसेच अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक या संदर्भात तक्रार करावयाची असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३९९९९, व्हाट्सअँप क्रमांक ८४२२००११३३/८४५९७४९२६६, तसेच दूरध्वनी क्रमांक ०२५३/२३१९७४४ वर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *