चांदवड- मनमाड रस्त्यावर पेट्रोल टँकर पलटी


  • रेणुका लॉन्सजवळ डिव्हायडरला धडकला; टँकर रिकामा असल्याने अनर्थ टळला

दक्ष न्यूज प्रतिनिधी:आनंद बडोदे

चांदवड : गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान चांदवड- मनमाड रस्त्यावर भारत पेट्रोलियमच्या डिझेल टँकरने शहरातील रेणुका लॉन्सच्या जवळ रस्त्याच्या डिव्हाइडरला धडक दिल्याने पलटी झाला. टँकर रिकामा असल्याने अनर्थ टळला.


टँकर चालक टँकर घेऊन जात असताना पिक अप गाडी ओव्हरटेक करताना त्याचा गाडीवर ताबा सुटल्याने तो टँकर समोर डिवाइडरवर आदळल्याने रस्त्याच्या समोरून येणाऱ्या बाजूस पलटी झाला. यात टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मनमाड पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले, पानेवाडी शिवारात केंद्र शासनाचे भारत पेट्रोलियम व डिझेलची कंपनी असून.

मनमाड येथून सकाळी पेट्रोल भरून मनमाड मार्गे चांदवडच्या दिशेने पेट्रोल डिलिव्हरी करण्यासाठी टँकर गेला होता. टँकर रिकामा येत असताना पलटी झाला. मनमाड ते चांदवडपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, प्रत्येक वाहन वेगात असते, त्यातून दुर्घटना होत आहेत. या वेगावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याबरोबर लॉन्ससमोरील डिव्हायडर काढण्याची मागणी होऊ लागलीय.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *