नाशिक शहरात उद्यापासून मनाई आदेश


  • २८ जूनपर्यंत शहरात जमावबंदी आणि शस्त्रबंदी
  • आषाढी एकादशी आणि बकरी ईद निमित्त आदेश
  • राजकीय पक्षांमधील वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता

दक्ष न्यूज: प्रतिनिधी

नाशिक : शहरात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी १४ जून ते २८ जूनपर्यंत मनाई आदेश जारी केला असून, या आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. आषाढी एकादशी आणि बकरी ईद निमित्त पोलीस आयुक्तालयाच्यावतीने काढण्यात आले आहेत.

जमावबंदी, शस्त्रबंदी करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता हे आदेश लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांमध्ये वाद सुरु असल्याने त्याचेही पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. या कायद्याचे उल्लंघन झाल्यात कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *