वणी ग्रामपालिकेची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न


  • ग्रामसभेत दिंडोरी बाजार समिती सभापती प्रशांत कड यांचा ग्रामपालिकेकडून नागरी सत्कार..

दक्ष न्यूज प्रतिनिधी : सतीश इंद्रेकर


वणी : ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.मात्र ग्रामसभेला अनुपस्थित असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व ईतर विभागाचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.सरपंच मधूकर भरसट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला महिला व पुरुष वर्गाने उपस्थिती दाखवली.ग्रामसभेत गावातील आवश्यक कामांसह रस्त्याच्या व इतर शासकीय योजनांबाबत माहिती देण्यात आली. मागील ग्रामसभेचा इतिवृत्ताचे वाचन ग्रामविकास अधिकारी जी आर आढाव यांनी केले.घरपट्टी व पाणीपट्टी,जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नागरी सुविधा,ग्रामपंचायत निधी,जिल्हा परिषद उपकर,अपूर्ण विकास कामे,१४ व १५ वा वित्त आयोग,लसीकरण आदि विषयांवर चर्चा झाली.

त्याचबरोबर सन २०२३-२४ च्या अंदाज पत्रकास मंजुरी घेणे आदि विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली.या वेळी विज वितरण कंपनीचे अधिकारी यांना RPI नेते रविकुमार सोनवणे यांनी विजेच्या समस्यांबाबत चांगलेच धारेवर धरले.यावेळी सरपंच मधूकर भरसट यांनी मध्यस्थता करत विजेच्या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येईल अशी नागरिकांना ग्वाही दिली.महिलांनी घरकुलाबाबत आपल्या समस्या ग्रामविकास अधिकारी यांना सांगितल्या व त्यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणीही यावेळी केली.

ग्रामीण रूग्णालयाच्या समस्या,खंडित वीजपुरवठा,वाहतूक समस्या इत्यादी प्रश्नांवर नागरिकांनी ग्रामसभेचे लक्ष वेधून घेतले,या प्रसंगी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रशांत कड हे बिनविरोध निवडून आले असल्याने त्यांचा ग्रामपालिकेच्या वतीने शाल व गुलाबपुष्प देऊन नागरी सत्कार करण्यात आला.या प्रसंगी ग्राम विकास अधिकारी जी आर आढाव,सरपंच मधूकर भरसट,उप सरपंच विलास कड,महेंद्र पारख,मुन्ना मणियार,रविकुमार सोनवणे,जमीर शेख,राहुल गांगुर्डे,जगन वाघ,सतीश जाधव,किरण गांगुर्डे,कैलास धुम,बंटी बागुल ग्रामपंचायत महिला सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *