छत्रपती सेने मार्फत येत्या 26 जुलैला गरजवंत मराठा बांधवानसाठी उद्योजकता मार्गदर्शन मेळावा..


दक्ष न्युज : प्रतिनिधी

नाशिक: मराठा समाजातील महिला व पुरुष यांचा कडे भागभांडवल नसल्या कारणाने नोकरी करावी लागत आहे ह्या तरुणांना स्वतःचे व्यवसाय सुरु करण्या साठी व त्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ मिळावे या साठी छत्रपती सेने मार्फत उदयोजकता मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे.

या मेळाव्यात अण्णा साठी पाटील आर्थिक मागस विकास महामंडळा तर्फे मराठा समाजातील बांधवाना 10 ते 15 लाखाचे बिनव्याजी कर्ज ( व्याज परतावा ) योजने बद्द्दल सखोल माहिती महामंडळाच्या विभागीय समन्वयक सौ. पल्लवी ताई मोरे यांचा मार्फत देण्यात येणार आहे.

तसेच प्रकल्प अहवाल ( प्रोजेक्त रिपोर्ट ) व कर्जा साठी बँकेला ; लागणारे डॉक्युमेंट या साठी ca श्री चेतन मराठे यांच्या मार्फत माहिती देण्यात येणार आहे तसेच श्री राम डावरे सर ca यांचा मार्फत व्यवसाय उद्योग प्रशिक्षण या बद्दल माहिती पर मार्गदर्शन देण्यात येणार आहे. सदर मेळावा हा महाराष्ट्र शासन व छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत निशुक्ल होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *