सध्याचा अर्थसंकल्प हा मुख्यत्वेकरुन देशातील युवक व शेतकऱ्यांना समर्पीत!..


देशपाळीवर जर पाहिलं तर करदात्यांना सवलती दिल्या आहेत. ५० हजारांची स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवून ७५ हजार केली आहे. सर्वसामान्यांसाठी जीवनावश्यक बाबींची तरतूद यात करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प सर्व घटकांना समाधानी करणारा अर्थसंकल्प आहे .रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करणं ही आमच्या सरकारची ओळख राहिली आहे.

आजच्या अर्थसंकल्पामुळे त्याला अधिक मजबुती मिळाली आहे. सरकारने एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्हची घोषणा केली आहे. यातून आयुष्यात पहिल्यांदाच नोकरी मिळवणाऱ्या युवकांचा पहिला पगार आमचं सरकार देईल. कौशल्य विकास आणि उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी किंवा एक कोटी युवकांना इंटर्नशिपची योजना यामुळे गावागावातील गरीब, युवक देशाच्या अग्रणी कंपन्यांमध्ये काम करतील. त्यांच्यासमोर शक्यतांचे नवे दरवाजे उघडले जातील.

  • काय आहे विशेष:

– विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प : ६०० कोटी
– महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार : ४०० कोटी
सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर : ४६६ कोटी
– पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प : ५९८ कोटी
– महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : १५० कोटी
– MUTP-३ : ९०८ कोटी
– मुंबई मेट्रो : १०८७ कोटी
– दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर :४९९ कोटी
– MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी : १५०कोटी
– नागपूर मेट्रो : ६८३ कोटी
– नाग नदी पुनरुज्जीवन : ५०० कोटी
– पुणे मेट्रो : ८१४ कोटी
– मुळा मुठा नदी संवर्धन : ६९० कोटी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *