देवळा तालुका रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी राकेश शिंदे तर सचिवपदी डॉ. सुनिल आहेर यांची निवड..


दक्ष न्युज प्रतिनिधी: आदिनाथ ठाकूर

देवळा : येथील रोटरी क्लब ऑफ देवळा टाउनचा पदग्रहण समारंभ सोमवार दि ८ रोजी येथील कै रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय योगाचार्य डॉ प्रज्ञा पाटील,उपप्रांतपाल डॉ आर डी भामरे, रोटरॅक्टर हर्षवर्धन सोनवणे,माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे,सतिश कलंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी राकेश शिंदे, सचिवपदी डॉ सुनिल आहेर यांनी पदभार स्वीकारला. रोटरॅक्टच्या अध्यक्षपदी अक्षय सोनवणे व सचिवपदी मनोज पवार यांनी देखील पदभार स्विकारला. नूतन पदाधिकाऱ्यांना रोटरी कॉलर, चार्टर, हॅमर व पिन देऊन पदभार सोपवला. मावळते अध्यक्ष एस टी पाटील यांनी गतवर्षाचा कामगिरीचा आढावा सादर केला.डॉ सुनिल आहेर यांनी आगामी वर्षाचा संकल्प व संभाव्य उपक्रमाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी उपप्रांतपाल डॉ आर डी भामरे यांनी प्रांतपाल डॉ राजेंद्र खुराणा यांच्या संदेशाचे वाचन केले. देवळा रोटरी क्लबने २४ व्या वर्षात पदार्पण केले असून सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या रोटरी क्लबने स्वतःची एक ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन डॉ प्रज्ञा पाटील यांनी सोहळ्याप्रसंगी बोलतांना व्यक्त केले.

यावर्षी मोहनदास गवळी, पंकज आहेर या नविन सदस्यांनी रोटरी क्लबचे सदस्यत्व स्वीकारले. या कार्यक्रम प्रसंगी तालुक्यातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेले सुरज निकम, सहाय्यक व्यवस्थापक प्रीतीश आहेर, पीएसआय शलाका शिरसाठ, भूषण आहेर यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविल्याबद्दल व पूर्वा पाटील हिने शालांत व बारावीच्या परीक्षेत पहिला आलेला श्रेयस सोनवणे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ व्ही एम निकम, डॉ हितेंद्र आहेर, डॉ वसंतराव आहेर, कौतिक पवार, प्रितेश ठक्कर , अरुण पवार, सतिश बच्छाव , एस टी पाटील, दिनेश देवरे,अरुण डी पवार, संजीव आहेर, कैलास बागुल, संदीप पगार, सुनिल देवरे, विलास सोनजे, भारत गोसावी, अब्रार मणियार, कैलास बागुल, सुनिल जाधव, रोशन अलीटकर, खंडू मोरे, रोटरॅक्ट कलबचे सदष्य अॅड रितेश निकम, सौरभ चव्हाण यासह बागलाण, कळवण, मालेगाव येथील रोटरी क्लबचे पदाधिकारी सद्ष्य उपस्थित होते. भगवान आहेर यांनी सूत्रसंचालन केले तर सुनिल आहेर यांनी आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *