नंदुरबार येथून ७१ गोवंश जनावरांची सुटका..


पल्लवी भावसार, दक्ष न्युज

नंदुरबार: गोवंश कत्तलीचे प्रमाण सद्या सर्वत्र वाढले आहे. याच पार्शवभूमीवर नंदुरबार येथून ७१ गोवंश जनावरांची सुटकाकरण्यात आली आहे. दि.१४ जून रोजी अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नवापुर शहरातील इस्लामपुरा परीसरात गोवंश जनावरे अवैधरित्या कत्तल करण्याचे इरादयाने व त्यांची बेकायदेशीर वाहतूक करणेसाठी बांधुन ठेवण्यात आलेले आहेत.

याबाबत माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे व उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार विभाग संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम निकम, शहर पोलीस ठाण्याचे सपोनि चंद्रकांत पाटील, पोउनि मुकेश पवार, स्थागुशा, पोउनि मनोज पाटील, पोउनि विशाल सोनवणे, नवापूर पोलीस ठाणे, पोउनि प्रतिक भिंगारदे व स्थानिक गुन्हे शाखा पथक व पोलीस ठाणे स्टाफ अशांनी नवापूर शहरातील इस्लामपुरा भागातील आरोपींचे ताब्यातील वेगवेगळ्या ठिकाणी बंदिस्त खोल्यांमध्ये एकूण 71 गोवंश जनावरे हे अवैधरित्या कत्तल करण्याचे इरादयाने व त्यांची बेकायदेशीर वाहतुक करणेसाठी निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत मिळून आले.

त्यामध्ये आरोपी नामे हासीम कुरेशी, जुबेर कुरेशी, रऊफ कुरेशी, शाहरुख कुरेशी, अरबाज युसूफ कुरेशी, जाकीर कुरेशी, समीर कुरेशी, फकीरा कुरेशी,अजिज खान, आबिद कुरेशी, इनायत खान, इरफान खान, सईद कुरेशी यांचेविरुध्द नवापूर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत ४ लाख २२ हजार रुपये किमतीची एकुण ७१ गोवंश जनावरे बांधलेल्या अवस्थेत मिळून आल्याने सर्व जनावरांची सुटका करुन त्यांची तातडीने चारापाण्याची व्यवस्था करुन त्यांना गोशाळेत दाखल करण्यात आले. सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *