एक्सप्रेसमधून मोबाईल चोरणारा गजाआड!
दक्ष न्युज प्रतिनिधी, गणेश केदारे
मनमाड: सद्या सर्वत्र चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यातच मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यातच मनमाड पोलिसांनी एक्सप्रेसमधून मोबाईल चोरणारा इसम गजाआड केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दिनांक २६ मार्च रोजी सीपीडीएस टीममध्ये कार्यरत हेड कॉन्स्टेबल समाधान मांगुर्डे व कॉन्स्टेबल धर्मेंद्र यादव आणि प्लॅटफॉर्म ड्युटीवर तैनात असलेले कॉन्स्टेबल विलास बर्डे हे ड्युटीवर असतांना एक इसम प्लॅटफॉर्मवर संशयास्पद स्थितीत फिरत असलेला आढळला.

या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याला अटक करून आरपीएफ पोलीस ठाण्यात आणून त्याचे नाव व पत्ता विचारला असता असता त्याने आपले नाव सोयल समीर शेख, वय 24 वर्ष, रा. नानावली असे सांगितले.
सदर व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडे ओप्पो कंपनीचा एक काळ्या रंगाचा मोबाईल आढळून आला. ज्याची किंमत अंदाजे १५०००/- रुपये असून त्याबाबत चौकशी केली असता सदर व्यक्तीने सदर मोबाईल क्रमांक १२१३६ नागपूर पुणे एक्सप्रेसमधून एका प्रवाशाकडील मोबाईल चोरला असल्याचे उघडकीस आले.
सदर व्यक्तीने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला ताब्यात घेण्यात आल आहे.