ब्रेकिंग! सिन्नर तालुक्यातील माळेगाव या औद्योगिक वसाहतीमध्ये भट्टीचा स्फोट..


दक्ष न्यूज प्रतिनीधी, बाळासाहेब सोनावणे

सिन्नर: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील माळेगाव या औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या हिंदुस्तान नॅशनल ग्लास कंपनीमध्ये भट्टीचा स्फोट झाला आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतू मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने निमा उद्योजक संघटनेचे उद्योजक देखील या ठिकाणी बचाव करण्यासाठी दाखल झाले.

रात्री आठ वाजेच्या सुमारास भट्टी फुटून ही आग लागली असून या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला कळवली. स्फोट झाल्यानंतर कंपनीतील कर्मचारी तातडीने बाहेर पडल्यामुळे या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *