चित्रपट प्रेमींसाठी खास घोषणा, आता ९९ रुपयात पाहायला मिळणार चित्रपट..


दक्ष न्युज प्रतिनिधी

मनोरंजन : राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त प्रेक्षकांना ९९ रुपये मध्ये चित्रपट पाहण्याची संधी मिळाली आहे. पीव्हीआर आयनॉक्स पासपोर्टने सिनेमाप्रेमिंसाठी एक खास घोषणा केली आहे. सिनेमा प्रेमींसाठी एक खास पासची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पास मध्ये सिनेमा प्रेमींनी या एका महिन्याच्या पास मध्ये दहा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.

पिव्हीआर आयानॉक्स पासपोर्ट या पासची किंमत ६९९ रुपये इतकी असणार आहे . म्हणजे आता सिनेमाप्रेमिना ६९९ रुपयात एका महिन्यात १० चित्रपट पाहता येणार आहे. मात्र सोमवार ते गुरुवार चित्रपटप्रेमी या पासचा वापर करू शकणार आहेत. विकइंडला मात्र हा पास वापरता येणार नाही.

पीव्हीआर आयनॉक्स पासपोर्ट हा पीव्हीआर आयनॉक्सच्या ॲपवर मिळेल किंवा पीव्हीआर आयनॉक्स वेबसाईटवरून देखील उपलब्ध होईल. दरम्यान या विशेष घोषणेमुळे चित्रपट प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *