व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण अन् काही तासात सुटका ?


दक्ष न्यूज प्रतिनिधी : संकेत भंगाळे व प्रवीण सूरुडे

नाशिक : प्रसिद्ध बिल्डर, व्यवसायिक गजरा ग्रुपचे संचालक हेमंत पारख यांच्या अपहरणाची बातमी समोर येताच शहरात एकच खळबळ उडाली होती. यामुळे पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे रात्री इंदिरा नगर पोलीस स्टेशन येथे तळ ठोकून होते.

या घटनेची माहिती मिळताच दक्ष न्यूज प्रतिनिधी संकेत भंगाळे व प्रवीण सूरुडे यांनी तेथील घडत असलेल्या गोष्टीची माहिती घेतली. या भागातील माजी नगरसेवक श्याम बडोदे, सतीश सोनवणे व पारख यांचे निकटवर्तीय आनंद सोनवणे यांनी स्वतः शोध मोहिमेत भाग घेतला.

पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम घते सीसीटीव्ही च्या मदतीने तपास सुरू केला. त्यात त्यांना यश आले असून पारख यांचे मध्यरात्री शेवटचे लोकेशन अंबेबहुला येथे होते. त्यावरून पोलिसांनी अधिक माहिती घेत अपहरणकर्त्यांच्या पाठलाग करत शोध मोहीम सुरू ठेवली. पोलिसांच्या सूत्रामार्फत मिळालेल्या माहितीनुसार हेमंत पारख यांना अपहरणकर्त्यानी त्यांच्या कडून खडणी घेत त्यांना सुरत येथे सोडून पळ काढल्याचे समजत आहे.

https://fb.watch/mPKQ5KEy0S/?mibextid=ZbWKwL

अपहरकर्त्यांनी पारख यांच्या घराची रेकी करून नियोजनबद्ध अपहरण केल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये रात्रभर होती. आता पोलीस या अपहरण करणाऱ्या आरोपींना कोणत्या प्रकारे अटक करतात हेच पाहणे औचित्याचे ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *