देवळाली कॅम्प ला बँकेत गेलेली महिला बेपत्ता


दक्ष न्यूज: प्रतिनिधी

  • बचत गटाचे पैसे काढायला गेली ती परतलीच नाही; सासूची देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार

देवळाली : कॅम्प येथील बँक ऑफ इंडियात बचत गटाचे पैसे काढायला गेलेली मोठी सून घरी परतली नसल्याची तक्रार हिराबाई दशरथ भोंडे त्यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात केली आहे.

आरती विकास भोंडे असे बेपत्ता महिलेचे नाव असून ती ननंद अलका जाधव व दुसरी सून अक्षदा हिच्याबरोबर गेली. परंतु अलका व अक्षदा परत आल्या तेव्हा ती त्यांच्याबरोबर नव्हती. आरती संसरी नाक्यापर्यंत आमच्या बरोबर होती. परंतु माझे काम आहे असे सांगून मागे राहिली. मला यायला उशीर होईल असे तिने सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे .

या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक एस बी चव्हाण करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *