भाजपा देशभरात राबविणार राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान, सेवा समर्पन अभियान तसेच कोविड लसीकरण महाअभियान– डॉ.अजित गोपछडे


नाशिक: करणसिंग बावरी

भारतीय जनता पार्टीच्यावतीने राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान, सेवा समर्पन अभियान तसेच  कोविड लसीकरण महाअभियान देशभरात राबविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक, वैद्यकिय आघाडी, महाराष्ट्र प्रदेश, संयोजक, राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान, महाराष्ट्र प्रदेश डॉ.अजित गोपछडे यांनी दिली ते भाजपा वसंतस्मृती कार्यालयात येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, उत्तर महाराष्ट्र वैद्यकिय आघाडी संयाजक डॉ.प्रशांत पाटील, वैद्यकिय आघाडी संयोजक डॉ.चंद्रशेखर नामपुरकर, डॉ. भालचंद्र ठाकरे, डॉ. विश्वनाथ पाटील, डॉ.मंजुषा दराडे, डॉ.चंचल साबळे, डॉ.माधवी गायकवाड, डॉ.श्रृती पालखेडकर, डॉ. वैभव जोशी, विलास भदाणे आदी उपस्थित होते.

या अभियानासाठी पदेशाचे लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनापासून मा.पंतप्रधान सदैव दलित, वंचीत,आदिवासी, मागास, शेतकरी, शेतमजुर व सामान्य नागरीकांच्या समाजातील प्रत्येक घटकांशी समर्पित आहेत. अनेक दशकानंतर समाजातील उपेक्षित घटकांचा आवाज नरेंद्र मोदी सरकारकडून एैकला जात असून त्यांच्या आकांक्षा पुर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सज्ज आहे.
              

भारतीय जनता पार्टी, वैद्यकिय आघाडी व आय.टी.सेल च्या माध्यमातून देशभरात राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान सुरू करण्यात आले आहे. या मध्ये देशभरात भारतातील राजस्व 2 लाख गांवामध्ये प्रत्येकी 2 स्वास्थ्य स्वयंसेवक नेमणूक करून त्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षित करून देशभरात कोविड महामारी मध्ये तसेच इतर आरोग्याच्या समस्या संदर्भात प्रशिक्षित करून संपुर्ण देशभरात 4 लाख स्वास्थ्य स्वयंसेवक सज्ज करण्यात येत आहेत.
                

या अभियाना मध्ये प्रत्येक वार्ड, प्रभाग, गांव व बूथ मधील 2 स्वास्थ्य स्वयंसेवक यांची नेमणूक करण्यात आली आहे.या प्रशिक्षणामध्ये ग्राम स्वच्छता, परिसराचे निर्जुतुंकीकरण, आरोग्य विषयक जनजागृती, प्लास्टीक निर्मृलन मोहिम, रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन आदी विषय स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्यात आले व त्या पध्दतीने काम सुरु  करण्यात आले.
              

सेवा व समर्पण अभियान याची संकल्पना राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.जे.पी.नड्डाजी यांनी विस्तृत केले आहे की,जनतेची सेवा करण्यासाठी आपले समर्पण करतांना समाजातील वंचीत घटकांसाठी रेशन अन्यधान्य बॅग वाटप करणे, सर्व रोग निदान व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
                

महात्मा गांधी जयंतीनिमित्त दि.2 ऑक्टेांबर 2021 रोजी पासून स्वच्छता संबंधी विविध कार्यक्रम आयोजित करणे, आत्मनिर्भरते साठी लहान शिल्पकार व कारागीर यांना प्रोत्साहन देणे खादीचा उपयोग करणे, हातमाग व स्थानिक उत्पादने वापरण्यास प्रोत्साहित करून बापुंच्या सिध्दांताचा प्रसार करणे.
               

कोविडमुळे प्रभावित झालेल्या अनाथ बालकांना पी.एम.केअरच्या माध्यमातून सहाय्य मिळवून देणे, नदी सफाई अभियान देशभरात राबविणे. या माध्यमातून सेवा व समर्पण अभियानांच्या माध्यमातून जनसेवेसाठी कार्य करणे.
                 

दि.17 सप्टेंबर 2021 रोजी आपल्या देशाचे लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनी लसीकरण महाअभियान सुरु करण्यात आले. केंद्र सरकारने 75 कोटीहून अधिक नागरीकांचे लसीकरण पुर्ण करुन देशातील नागरीकांना कोविड या महामारीपासून वाचविण्याकरिता संजीवनी दिली. जन्मदिनाचे औचित्य साधुन अभियानाची सुरवात करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकत्यांच्या माध्यमातून 25 नागरीकांचे लसीकरण करुन घेण्यात आले व लसीकरणाची नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यामुळे सर्वाधिक लसीकरणाचा उच्चांक गाठला.
                

राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान, सेवा समर्पण अभियान तसेच कोविड लसीकरण अभियान या तिन्ही अभियानांच्या माध्यमातून  जगभर कोरोनाचे महासंकट आपल्या केंद्र सरकारच्या आरोग्य विषयक नियोजनामुळे आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक गांव, वार्ड येथील स्वास्थ्य स्वयंसेवकांच्या माध्यमातून सेवा समर्पण भावनेतून लसीकरण मोहिम यशस्वीरित्या सुरु ठेवण्यात आली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री मा.डॉ.सौ.भारतीताई पवार यांच्या  आरोग्य मंत्रालयाला संपुर्ण भारतातील स्वास्थ्य स्वयंसेवकांची टिम कायमस्वरुपी जोडण्याचा महात्वकांक्षी प्रयत्न आहे.
               

दि.25 सप्टेंबर 2021 रोजी पं.दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त अंत्योदय हा संकल्प मा.पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदीजींची महत्वकांक्षी कार्यक्रम साजरा करण्यात आला. मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजींच्या 20 वर्षामध्ये सरकारने सबका साथ – सबका विकास, सबका विश्वास सबका प्रयास या भावनेला मूर्त स्वरुप दिले.        

 भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाडी व प्रकोष्ठ, युवा मोर्चा या सर्वाच्या माध्यमातून वरील सर्व अभियान संपुर्ण देशभर राबविण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *