नाशिक

दक्ष न्यूज – शेती वापराचा 90 मॅट्रिक टन युरिया खाजगी कंपनीच्या घशात…


दक्ष न्यूज : प्रतिनिधी

दिंडोरी : रामशेज येथील एका खाजगी कंपनीने शेतीसाठी वापरला जाणारा युरिया औद्योगिक वापर करत असल्याच्या कृषी विभागाच्या मोहिमेत उघड झाल्याने कंपनी व्यवस्थापकासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

रामशेज येथील गट नंबर ३०५/१३ मध्ये असलेल्या पशुखाद्य बनविणाऱ्या एका खाजगी कंपनीची तपासणी रसायन व खते मंत्रालयाचे आवर सचिव चेतराम मीना व जिल्हा परिषद मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी यांनी केली असता तेथे युरिया खरेदीचे परिपूर्ण दस्तावेज, साठा नोंदवही, खरेदी किंमत, युरिया दैनंदिन वापर नोंदवही, कंपनी प्रशासनाकडून मागूनही मिळत नसल्याने संशय आला.

त्यानंतर पुन्हा कंपनीमध्ये तपासणी केल्याने 50 किलो बागेतील युरियाची किंमत 24 ते 28 रुपये किलो असल्याचे लक्षात आल्याने युरियाची तपासणी केली असता टेक्निकल ग्रेड औद्योगिक वापरासाठीचा युरिया नसून शेती वापराचा अनुदानित युरिया असल्याचे निदर्शनास आल्याने 90 मॅट्रिक टन वजनाच्या 50 किलो वजनाच्या १८०० बॅगा किंमत 22 लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज सीलबंद करून दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक सुदर्शन आवारी करीत आहे,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *