दक्ष न्यूज – नाशिक मधील बसस्थानक असुरक्षित,पेट्रोल टाकून कर्मचाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न..
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : एकीकडे पुणे येथील स्वारगेट या ठिकाणी घडलेली घटना ताजी असताना दुसरीकडे नाशिकमध्ये काल घडलेल्या घटनेनंतर नाशिकची बस स्थानक देखील किती असुरक्षित आहे हे अधोरेखित झाल आहे..
नाशिकच्या ठक्कर बाजार येथे मद्यपिंचा धिंगाणा कायम सुरूच असतो यातच एक दुर्दैवी घटना घडली आहे.बसस्थानकातील शौचालय जवळ बसलेल्या कर्मचाऱ्याला एका मद्यपीने थेट पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या मद्यपीने प्लास्टिकच्या पिशवीत पेट्रोल आणून ते त्यांच्या अंगावर टाकलं. यात कर्मचारी साठ टक्के भाजले आहेत त्यांच्यावर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान यावरून इथल्या बस स्थानकाची सुरक्षा धोक्यात असल्याचं समजतंय या ठिकाणी सीसीटीव्ही असून देखील ते बंद असल्याने बसस्थानक प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.एकंदरीतच या घटनेनंतर बस स्थानकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहेतसेच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल आहे.मात्र आता तरी या मद्यपींचा सुरू असलेला गोंधळ थांबेल का हा सवाल कायम आहे.