दक्ष ब्रेकिंग न्यूज : जुन्या वादातून युवकाचा खून, होळीच्या सणाला गालबोट
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : शहरात होळीचा जल्लोष सुरू असतानाच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक घटना घडली. शुभम पार्क येथील जोसेफ चर्चसमोर जुन्या वादातून सुमित देवरे (वय ३०) या युवकाचा चॉपरने वार करून निर्घृण खून करण्यात आला. या हल्ल्यात चार जण सामील असून, मुख्य आरोपी वैरागर फरार आहे.

घटनास्थळी तणाव, पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
होळीच्या दिवशी भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश हांडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी सुमित देवरेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलीस अधिकाऱ्यांची भेट, आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
घटनास्थळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, गुन्हे शाखेचे अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढते? नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेमुळे नाशिकमध्ये पुन्हा गुन्हेगारी वाढत असल्याची चर्चा रंगली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांकडून कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
➡️ अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडले राहा!