दक्ष न्यूज – श्री येसोजी महाराजांची धुलिवंदनाच्या दिवशी भव्य मिरवणूक..
दक्ष न्यूज ; प्रतिनिधी
नाशिक : दिडशेहुन अधिक वर्षांची परंपरा असलेली येसोजी महाराजांची मिरवणूक शुक्रवार दि. १४/०३/२०२५ रोजी काढण्यात येणार आहे. धुलिवंदनाच्या दिवशी नाशिक शहरातून पारंपारीक पध्दतीने विविध भागातून वीरांची मिरवणूक निघत असते. त्यात देवादिकांचे अवतार धारण करून हे वीर नागरिकांमध्ये प्रसिध्द आहेत. हे वीर म्हणजे नवसाला पावणारे अशी ख्याती जनमानसात आहे.
श्री येसोजी महाराज वीर आपल्या तुळजाभवानी मंदिर, घनकर लेन येथून सायंकाळी ६.०० वा. निघतात. रस्तोरस्ती व घरोघरी नागरिक यांची मनोभावे पुजा करतात. हया वर्षी श्री येसोजी महाराज वीर होण्याचा मान मोरे कुटुंबियातील श्री. सागर मोरे (ना. रोड) हयांना मिळाला असून त्यांचे तोंडावर येसोजी महाराजांचा चांदीचा मुकुट बांधला जातो. तसेच वीरास राजेशाही पोषाख चढविला जातो, त्यालाच येसोजी महाराज वीर म्हणतात.

श्री येसोजी महाराज वीर यांची एक अख्यायिका सांगितली जाते. श्री येसोजी महाराज यांना साल्हेर-मुल्हेर येथील लढाईत वीरगती प्राप्त झाली. त्यांचा वारसा पुढे जतन करण्यासाठी त्यांचे वंशज मोरे कुटुंबियांनी त्यांचा चांदीचा मुखवटा तयार करून वीराची स्थापना केली.सदरची मिरवणुक नाशिक घनकर लेन येथून सुरूवात होऊन मल्हार गेट नंतर रविवार कारंजा, चांदीचा गणपती नंतर जुना सरकार वाडा पोलीस चौकी, सराफ बाजार मार्गे रामकुंडावर नाचत जातात.