दक्ष न्यूज – मुख्याधिकारी यांनी थकबाकीदारांचे नळजोडणी खंडित करण्याचे काम घेतले हाती..
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
निफाड : नगरपंचायतीच्या दैनंदिन कामकाजावर व विकास कामावर होत आहेत. त्या अनुषंगाने मुख्याधिकारी अमोल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकीदारांचे नळजोडणी खंडित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.नगरपंचायत हद्दीतील थकीत घरपट्टी व पाणीपट्टी धारकांना वारंवार कर भरणे बाबत जाहीर आवाहन केले असून थकबाकीदारांना नोटीस देऊन सुद्धा कर भरण्याकडे काना डोळा केला आहेत.
आत्तापर्यंत घरपट्टी ४९ % वसुली करण्यात आली असून पाणीपट्टी ३३% वसुली करण्यात आली आहे. घरपट्टीची चालूमागणी व थकीत एकूण रक्कम जवळपास ८० लाख येणे बाकी असून पाणीपट्टीची चालू मागणी व थकीत असे एकूण रक्कम दीड कोटीच्या आसपास येणे बाकी आहेत. निफाड नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल रंगनाथ कुदे यांनी निफाड करांना कर भरा सहकार्य करा असे आवाहन केले यावेळी पानी पुरवठा अधिकारी भाग्यश्री सोणवने ह्या स्वत उपस्थित होत्या .

त्यानुसार दि. १२/३/२०२५ रोजी विशेष पथक नेमून ८ थकीत नळधारकांचे जोडणी खंडित करण्यात आले असून यापुढे देखील अशाप्रकारे नळ जोडणी खंडित किंवा मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल. तरी सर्व मालमत्ताधारकांनी घरपट्टी व पाणीपट्टी तसेच व्यापारी संकुलाचे चालू व थकीत कर भरून नगरपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी निफाड यांनी केले आहे.