दक्ष न्यूज – नातवाचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा..
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
इगतपुरी : आपल्या नातवाचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत माजी सभापती यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ लहागे साहेब यांनी आपल्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त त्रंबकेश्वर तालुक्यातील अनाथ आश्रम येथील मुलांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून मुलांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसाबरोबरच एक नवीन संदेश पण दिला वाढदिवस हा मोठ्या उत्साहात करण्यापेक्षा गोरगरीब मुलांच्या चेहऱ्यावर हसू येईल असे करा त्यांच्यावर एक मायेचा हात असू द्या म्हणूनच लांहगे साहेबांचे नातू शिव याचा पहिला वाढदिवस अनाथ मुलांना साहित्य वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी संपूर्ण लहागे कुटुंब उपस्थित होते