नाशिक

दक्ष न्यूज – भीमगर्जना मित्र मंडळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भोसले..पहा सविस्तर


दक्ष न्यूज : प्रतिनिधी

मनमाड : जमधाडे चौकातील भीमगर्जना मित्र मंडळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या नवीन अध्यक्षपदी बाळासाहेब भोसले, सचिवपदी राजेंद्र वारुळे आणि खजिनदारपदी सुनील त्रिभुवन यांची निवड झाली आहे.
भीमगर्जना मित्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य दीपक झाल्टे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक जमधाडे चौकातील माता रमाबाई आंबेडकर बौद्ध विहारात आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत आगामी जयंती उत्सवाच्या तयारीसंबंधी विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, तसेच उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची नियोजन कसे असावे यावर चर्चा झाली. यावेळी मागील उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला आणि आर्थिक अहवाल सादर करण्यात आला.

मंडळाचे सदस्य, पत्रकार अमोल खरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची २०२५ वर्षातील कार्यकारणी जाहीर केली, जी पुढील प्रमाणे आहे अध्यक्ष बाळासाहेब भोसले, उपाध्यक्ष सुनील विस्ते, राहुल केदारे, खजिनदार सुनील त्रिभुवन, उपखजिनदार गिरीश देवरे, सचिव राजेंद्र वारुळे, उपसचिव सचिन परदेशी, ऑडिटर दिनकर कांबळे, सचिन साळवे, मिरवणूक प्रमुख पत्रकार अमोल खरे, दीपक झल्ट, दिलीप त्रिभुवन, वार्ड कमिटी, मंडळ सदस्य जाहीर केले.

यावेळी सागर खरे, विशाल साळवे, रोहित साळवे, गिरीश देवरे, उमेश जाधव,  राहुल दाणी, कुणाल निरभवणे, देविदास निते, संदीप सोहळे,  संतोष रानडे, मनोज गांगुर्डे, प्रवीण साळवे, अनिल चव्हाण, साहिल झाल्टे, अमोल निरभवणे, बब्बू झाल्टे, आकाश निरभवणे, संदीप पाटील, निखिल वंजारे, देविदास गुंजाळ, राहुल साळवे,प्रतीक त्रिभुवन वैभव देवरे, यश रोकडे, सलमान शेख, गोगा परदेशी आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *