दक्ष न्यूज – “संस्कृती परंपरा वीरांची नाशिकच्या इतिहासाची” 400 वर्ष्यांच्या मानाच्या ५ वीरांसह इतर ७० वीर एकाच सन्मानपिठावर येणार..
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : नाशिकच्या वीर मिरवणुकीची ४०० वर्षांची परंपरा नवीन पिढीला कळावी,तसेच शहरात नव्याने वास्तव्यास आलेल्या नागरिकांना त्याचे महत्त्व समजावे या उद्देशाने ‘संस्कृती परंपरा वीरांची नाशिकच्या इतिहासाची या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी ६ ते १० या वेळेत मानाच्या ५ वीरांसह इतर ७० वीरांचे गोदाकाठावरील मुक्तेश्वर पटांगणात मान्यवरांच्या हस्ते पूजन आणि सन्मान केला जाणार आहे.
नाशिक शहराची ही सांस्कृतिक ओळख ठळकपणे सर्व नागरिकांसमोर तसेच राज्य व देशासमोर आणणे हा यामागचा उद्देश आहे. या मंचकडून वीर सन्मानाच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अॅड. जयंत जायभावे, शाहू खैरे, अजय बोरस्ते, देवानंद बिरारी आदी यावेळी उपस्थित होते.

डाक्युमेंटरीद्वारे वीरांची माहिती
या सोहळ्यात भव्य स्क्रीनवर मानाच्या पाच वीरांची डाक्युमेंटरी दाखविण्यात येणार आहे. तसेच या वीरांचा व त्यांच्या कुटुंबियांचा खास बनविलेले स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला जाणार आहे.