दक्ष न्यूज – धक्कादायक…सहाय्यक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
जळगाव : नवीन वीज मीटर बसून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, चोपडा शहर कक्ष-२ येथील सहाय्यक अभियंता, अमित दिलीप सुलक्षणे यांनी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.तक्रारदार यांनी त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने सुलक्षणे यांना रंगेहात पकडले आहे.
वीज मीटर बसवण्यासाठी सुलक्षणे याने तक्रारदाराकडे ५५००/- रुपये लाचेची मागणी केली होती,मात्र तडजोडी अंती ४५००/- रुपये मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.तसेच त्याचे विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

असे असले तरी दिवसेंदिवस लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे