दक्ष न्यूज – “पोलीस आयुक्त आपल्या दारी” उपक्रमाला नाशिक शहरातील नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद..
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : मुख्यमंत्री यांचे निर्देशानुसार १०० दिवसांच्या कृती आराखडया अंतर्गत पोलीस आयुक्त व पोलीस अधिकारी यांनी नागरीकांच्या तक्रारी जाणुन घेतल्या.क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा” या विषयावर राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महानगरपालीका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना दृक परिषदेद्वारे मा.उप मुख्यमंत्री (नगरविकास, गृहनिर्माण), मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) व मंत्रीमंडळाच्या उपस्थितीत संबोधीत केले.
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सुरू केलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखडयामधील राबविण्यात येत असलेल्या ७ कलमी कार्यक्रमाअंतर्गत जनतेच्या तक्रारींचे निवारण करणेसाठी मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली समक्ष नागरीकांना भेटुन त्यांच्या तक्रारी जाणुन घेण्यासाठी “पोलीस आयुक्त आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

त्यानुसार मा.श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सौभाग्यनगर, नाशिकरोड पोलीस ठाणे येथे जावुन नागरीकांची भेट घेतली. त्यावेळी नागरीकांनी पोलीस आयुक्तांशी थेट संवाद साधुन नागरीकांनी त्यांच्या अडचणी पोलीस आयुक्तांसमोर मांडल्या असुन त्यावर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.
विविध ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी उपस्थित राहुन नागरीकांच्या तक्रारी जाणुन घेतल्या.पोलीस आयुक्त आपल्या दारी’ या उपक्रमाला नाशिक शहरातील नागरीकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असुन वरिष्ठ पोलीस अधिकारी नागरीकांना आपल्या परिसरात समक्ष भेटत असल्यामुळे यामुळे नांगरीकांनी सदर उपक्रमाची प्रशंसा केली असुन भेट देणा-या अधिकारी यांचे आभार मानले आहेत.