दक्ष न्यूज – अंबड पोलीस ठाणे हद्दीत नागरी संवाद..
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : अंबड पोलीस ठाणे हद्दीत आज दिनांक 12 मार्च 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 100 दिवस कृती आराखडा अनुषंगाने पोलीस आयुक्त आपल्या दारी या उपक्रमांतर्गत खुटवड नगर पोलीस चौकी खुटवड नगर नाशिक या ठिकाणी मा. मोनिका राऊत ,पोलीस उपायुक्त, परिमंडळ २,नाशिक शहर यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना सायबर गुन्ह्याविषयी माहिती सांगून सायबर क्राईम पासून सावधान राहण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

आपत्कालीन परिस्थितीत डायल 112 या क्रमांकावर संपर्क केल्यास आपणास तात्काळ पोलीस मदत मिळेल बाबत माहिती देण्यात आली. तसेच खुटवड नगर येथे पोलिसांची ई पेट्रोलिंग करीता सुरक्षित नाशिक एप वर नवीन पॉइंट तयार करून पोलीस पेट्रोलिंग ठेवणे बाबत नागरिकांना आश्वासित केले. सदर नागरी संवाद कार्यक्रमाकरिता परिसरातील 70 ते 80 नागरिक हजर होते.