दक्ष न्यूज – दोन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : शेतीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्याचे मोबदल्यात तलाठ्याने २५०००/- रुपयांची मागणी केल्याची घटना घडली आहे. योगेश ज्ञानेश्वर जाधव, तलाठी, ठेंगोडा, ता. सटाणा, जि. नाशिक व संजय गंगाधर साळी, मंडळ अधिकारी, मंडळ अधिकारी कार्यालय, सटाणा, जि. नाशिक यांनी १५०००/- रुपयांची लाच स्विकारण्याचा प्रयत्न केला. खरेदी केलेल्या शेतीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्याचे मोबदल्यात त्यांनी तक्रारदाराकडे २५०००/- रुपयांची मागणी केली होती.

या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून नाशिक येथे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासणी आली असता दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी मंडळ अधिकारी साळी यांचे सांगण्यावरून तलाठी जाधव यांनी पंचायत समक्ष तक्रारदार यांच्याकडे १५०००/- रुपयाची मागणी करून ती स्वीकारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सटाणा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ (ए) १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.