दक्ष न्यूज – खून करून पसार झालेले आरोपी 48 तासांत जेरबंद…
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : शहरातील संत कबीर नगरमधील युवकाचा टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून निघृण खून केल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. जुन्या वादाची कुरापत काढुन तरुणास कोयता, बेसबॉलचा दांडा, रॉड, लोखंडी शिकंजा व दगडांनी मारहाण करून त्याचा खून करण्यात आला.अरुण बंडी असं या मृत तरुणाचं नाव होत.

याबाबत मृताच्या भावाने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.याची दाखल घेत गंगापूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने अत्यंत शिताफीने 48 तासांत आरोपींना जेरबंद केले आहे. सदर गुन्हयात इसम नामे १) समीर मुनीर सैय्यद, वय २९ वर्षे, रा. संतकबीरनगर, नाशिक २) जावेद सलीम सैय्यद, वय ३२ वर्षे, रा. संतकबीरनगर, नाशिक ३) विलास संतोष थाटे, वय १८ वर्षे, रा. संतकबीरनगर, नाशिक ४) करण उमेश चौरे, वय १९ वर्षे, रा. संतकबीरनगर, यांना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.