दक्ष न्यूज – आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी विजेत्या संघासह सर्व सहभागी संघांना मिळाले इतके कोटी रुपये बक्षीस..
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
दुबई : भारतीय क्रिकेट टीमने न्यूझीलंडचा अखेर २५ वर्षांपूर्वीचा बदला घेत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये न्यूझीलंडला हरवून विजय मिळवला.रोहित शर्माने एकहाती तुफानी फलंदाजी केली आणि भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.त्यामुळे रो’हिट’ शो सर्वांना पाहायला मिळाला.दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर फायनल सामना झाला. टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या विजयासह भारताने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं.
टीम इंडियाला 19.48 कोटी रुपये मिळाले आहेत.या स्पर्धेत टीम इंडियाने एकही सामना न गमावता ही स्पर्धा आपल्या नावे केली आहे. तसेच न्यूझीलंडला उपविजेते पद मिळाल्याने त्यांना 9.74 कोटी रुपये मिळाले. सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या टीम्स ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांना प्रत्येकी 4.87 कोटी रुपये मिळाले.सध्या संपूर्ण देशभरातून क्रिकेटप्रेमी भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

इतर संघांना मिळालेली बक्षीस रक्कम –
अफगाणिस्तान आणि बांगलादेश (पाचवे आणि सहावे स्थान) : 3.04 कोटी रुपये
पाकिस्तान आणि इंग्लंड (सातवे आणि आठवे स्थान) : 1.22 कोटी रुपये
ग्रुप स्टेजमधील सामना जिंकणाऱ्या संघाला : 29.61 कोटी रुपये
स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व संघांना : 1.08 कोटी रुपये