दक्ष न्यूज – शेत जमिनीच्या मोजणीसाठी मागितली लाच, शिपाई एसीबीच्या जाळ्यात.
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
निफाड : उप अधीक्षक यांच्या ओळखीचा फायदा घेत शिपायाने शेत जमिनीच्या मोजणीसाठी तब्बल ४०००००/- रुपयांची लाच मागीतली असल्याचा धक्कादायक प्रकार निफाड येथे घडला आहे. तर तडजोडीअंती ३५००००/- रुपये घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शिपायाला रंगेहाथ पकडले आहे.नितेंद्र काशिनाथ गाढे (वय 35) असे लाच घेणाऱ्या उप अधीक्षक भूमी अभिलेख निफाड कार्यालयातील शिपायाचे नाव आहे.
तक्रारदाराच्या मावशीची मौजे दीक्षि, तालुका निफाड येथे शेतजमीन असून सदर शेत जमीन मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे २५ जानेवारी रोजी अर्ज केला होता. तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सदर जमिनीची भूमि अभिलेख कार्यालय येथून दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ रोजी मोजणी झाली होती.

परंतु हद्दी खुणा दाखवायच्या बाकी होत्या, लोकसेवक शिपाई गाडे यांनी भाबड, उप अधीक्षक, भूमी अभिलेख यांच्याशी बोलून सदरचे काम दिलेल्या तारखेस दिनांक ७ मार्च २०२५ रोजी हद्दी खुणा दाखवून व नकाशा काढून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात दिनांक ६ मार्च रोजी स्वतःसाठी व भाबड साहेब यांच्या नावे ४०००००/- रुपये लाचेची मागणी केली व तडजोडी अंति ३५००००/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दिनांक ७ मार्च रोजी स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.