दक्ष न्यूज – नाशिक जिल्ह्याला विविध विभागाअंतर्गत 8 बालस्नेही पुरस्कार प्राप्त, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार..
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नुकतेच बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने बालस्नेही पुरस्कार 2024 चे वितरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपंन्न झाले. यात नाशिकचे जिल्हाधिकरी जलज शर्मा यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी या पुरसकाराने सन्मानित करण्यात आले असून जिल्ह्याला विविध विभागांतर्गत एकूण 8 बालस्नेही पुरस्कार प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे यांनी दिली आहे.

असे आहेत जिल्ह्यातील नाशिक विभागातील बालस्नेही पुरस्काराचे मानकरी
- उत्कृष्ट जिल्हाधिकारी : श्री. जलज शर्मा
- उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी :श्रीमती आशिमा मित्तल, जिल्हा परिषद नाशिक
- उत्कृष्ट महिला व बाल विकास अधिकारी : श्री. सुनील दुसाणे
- उत्कृष्ट खुले निवारागृह : आस्था, नाशिक
- उत्कृष्ट काळजी वाहक: अश्विनी देवरे, नाशिक
- उत्कृष्ट बालगृह: अशिर्वाद गार्डा बालसदन, खंबाळे, त्र्यंबकेश्वर, नाशिक
- उत्कृष्ट निरीक्षणगृह/ बालगृह: मुलीचे निरीक्षणगृह/बालगृह नाशिक
- उत्कृष्ट दत्तक एजन्सी: आधार आश्रम नाशिक